दिव्यांग वधु-वरांचा सामूदायिक विवाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग वधु-वरांचा
सामूदायिक विवाह
दिव्यांग वधु-वरांचा सामूदायिक विवाह

दिव्यांग वधु-वरांचा सामूदायिक विवाह

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : दिव्यांग प्रतिष्ठानतर्फे दिव्यांग वधु-वर यांच्यासाठी येत्या ११ डिसेंबर रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोमवार पेठेतील श्री संत गाडगे महाराज (अकुल) धर्मशाळा येथे दुपारी १२ वाजून १५ मिनिटे या मुहूर्तावर हा सोहळा होणार आहे.
प्रतिष्ठानतर्फे गेल्या पाच वर्षांपासून दिव्यांग वधु-वर यांचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. यंदा या सोहळ्यात १५ वधु-वर सहभागी होणार आहेत. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या विविध जिल्ह्यातून वधु-वरांना साडी-चोळी, संसारोपयोगी साहित्य याबरोबरच ११ दांपत्यांना घरगुती पिठाची गिरणी, तीन दांपत्यांना झेरॉक्स मशिन, एका दांपत्याला इलेक्ट्रॉनिक पापड मशिन भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रचार प्रमुख नंदकुमार राऊत यांनी दिली.