रस्त्यात अडवून मोबाइल हिसकावणारे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यात अडवून मोबाइल 
हिसकावणारे अटकेत
रस्त्यात अडवून मोबाइल हिसकावणारे अटकेत

रस्त्यात अडवून मोबाइल हिसकावणारे अटकेत

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः तरुणांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून नेण्याचा प्रकार नऱ्हे येथे घडला. या प्रकरणातील संशयित आरोपींना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

रतीशकुमार सहानी (वय २२, रा. वाघोली), मुकेश सहानी (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक) , मनीषकुमार सहानी (वय २३, रा. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विजय आटपाडकर (वय २५, रा. आंबेगाव) याने फिर्याद दिली आहे. विजय शुक्रवारी (ता. २) रात्री साडे बारा वाजता नऱ्हे येथील भुमकर चौकातून पायी जात होता. त्यावेळी टोळक्‍याने त्याला अडवून मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. तसेच दुसऱ्या तरुणाचा मोबाइलही टोळक्‍याने जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंहगड पोलिसांनी संशयित आरोपींना तत्काळ अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजूरकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.