तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण
तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः प्रेम प्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन तरुणाचे ओळखीच्या तरुणांनी अपहरण करून त्यास कोंडून ठेवत जबर मारहाण केली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तरुणाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (ता. १) मुंढवा परिसरात घडली.
तन्मय दीपक पाचरणे (वय २०, रा. पाचरणे आळी, वाघोली), वेदांत महादेव गपाट (वय १९, रा. शंकरनगर, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी करण शंकर माळी (वय १९, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. करणने संगणकविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला असून सध्या तो एका हॉटेलमध्ये अर्धवेळ काम करत आहे. वाघोलीतील एका महाविद्यालयात करण, तन्मय व तरुणी एकत्र शिक्षण घेत असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख होती. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण हा त्याच्या मित्रांना भेटून दुचाकीवरून कामाला निघाला होता. त्यावेळी संशयित आरोपी तन्मयने करणच्या मोबाइलवर संपर्क साधला. दुचाकी बंद पडल्याचे सांगून करून त्याला मुंढवा परिसरात बोलावले. तन्मयने करणला दुचाकीवरून घरी सोडण्यास सांगितले. काही अंतर गेल्यानंतर तन्मयचे मित्र वेदांत व त्याचे साथीदार मोटारीमध्ये बसले होते. दुचाकीवरून उतरून तन्मयने करणला मोटारीमध्ये बसण्यास सांगितले. दरम्यान, करणला संशय आल्याने त्याने त्याच्या मित्राच्या मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा तन्मयने त्याचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर तन्मय, वेदांत व त्यांच्या साथीदारांनी करणला मोटारीमध्येच मारहाण केली. महाविद्यालयातील मैत्रिणीशी तुझे प्रेमप्रकरण सुरू असून तिच्याशी संबंध ठेवू नको, अशी धमकी त्याल दिली. मुंढवा रस्त्यावरील एका खोलीत त्याला डांबून ठेवत त्याला दारू पाजली. तसेच दारुची बाटली त्याच्या डोक्‍यात फोढून त्यास बांबू व सळईने जबर माहराण केली. या जबर मारहाणीत करण बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी पहाटे करण शुद्धीवर आला. त्यानंतर तन्मय व त्याच्या साथीदारांनी त्यास खराडी परिसरात सोडून दिले. करणने या घटनेची माहिती त्याच्या भावाला दिली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. दरम्यान, करणवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.