पुण्यात ५१ लाख चौरस फूट जागेची एलर्इर्इडी प्रमाणित नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात ५१ लाख चौरस फूट जागेची एलर्इर्इडी प्रमाणित नोंदणी
पुण्यात ५१ लाख चौरस फूट जागेची एलर्इर्इडी प्रमाणित नोंदणी

पुण्यात ५१ लाख चौरस फूट जागेची एलर्इर्इडी प्रमाणित नोंदणी

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : शाश्वत डिझाइन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकाऊ इमारत म्हणून प्रमाणपत्र मिळण्यात पुण्यातील इमारतींमधून ५१ लाख २६ हजार १२२ चौरस फूट जागा पात्र ठरली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान एनर्जी अँड इन्व्हायर्नमेंटल डिझाईन (एलईर्इडी) म्हणून या जागेची नोंदणी झाली आहे. प्रमाणित इमारतींपैकी १९ प्लॅटिनम आणि चार गोल्ड इमारती आहेत.
पुण्यात २०२१ या वर्षात एलईर्इडी प्रमाणित इमारतीतील १६ लाख ८८ हजार ११८ चौरस फूट जागा नोंदवली गेली होती. तर यंदाच्या केवळ १० महिन्यांच्या कालावधीत हा आकडा २०० पेक्षा जास्त टक्क्यांनी वाढला आहे. २०१९ च्या तुलनेत नोंदणी होण्याची टक्केवारी २५० टक्क्यांनी वाढली आहे. २००५ पासून ऑक्टोबर २०२२ पर्यंत २०१ एलर्इर्इडी प्रमाणित इमारतींमधून चार कोटी ४८ लाख ७७ हजार ८७८ चौरस फूट ग्रॉस फ्लोअर एरियाची नोंद केली गेली आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यानची स्थिती

दिल्ली, बेंगळुरू, मुंबर्इ, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकता
देशातील प्रमुख सात शहरे

तीन कोटी ९५ लाख ३९ हजार ७७० चौरस फूट
एलर्इर्इडी प्रमाणित इमारतींचे ग्रॉस फ्लोअर एरिया

१३७ नवीन इमारतींना
सात शहरांमध्ये प्रमाणीकरण

८२
प्लॅटिनम इमारती

४९
गोल्ड इमारती

चार
सिल्व्हर प्रमाणित इमारती
(नोंदणीमध्ये किती पॉर्इंट मिळतात, त्यावरून इमारतींना सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम हे रेटिंग दिले जाते.)

एलईर्इडी नोंदणी झालेली पुण्यातील जागा (चौरस फुटांत) :
वर्ष - नोंदणी झालेली जागा
२०१९ - १४,६१,८५९
२०२० - ४,६६,३६९
२०२१ - १६,८८,११८
ऑक्टोबरपर्यंत २०२२ - ५१,२६,१२२
२००५ ते २०२२ - ४,४८,७७,८७८

एलईर्इडी नोंदणी झालेल्या इमारतींची संख्‍या :
वर्ष - इमारतींची संख्या - रेटिंग
२०१९ - १४ - ७ गोल्ड व ७ प्लॅटिनम
२०२० - ८ - ७ गोल्ड व १ सिल्वर
२०२१ - १० - १० गोल्ड
२०२२ - १९ प्लॅटिनम व ४ गोल्ड
स्रोत : नाइट फ्रँक इंडिया

संतुलित पर्यावरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी टिकाऊ वास्तू आणि हरित इमारती हे भारतीय आणि जागतिक बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पर्यावरण आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार कंपन्या आता पर्यावरणपूरक बाबींकडे लक्ष देत असल्याचे दिसते. गुंतवणूकदार भारतातील सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या जागरूक व्यवसायांना मदत करण्यास उत्सुक आहे.
- सुजाथा गणपथी,
उपाध्यक्ष, सस्टेनेबिलिटी अँड वेल स्टँडर्ड बिझनेस, नाइट फ्रँक इंडिया


एलईर्इडी म्हणजे काय?
एनर्जी अँड इन्व्हायर्नमेंटल डिझाईन (एलर्इईडी) ही एक ग्रीन बिल्डिंग रेटिंग यंत्रणा आहे. युनायटेड स्टेट्स ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने (यूएसजीबीसी) ही संस्था विकसित केली आहे. हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त टिकाऊ इमारत प्रमाणपत्र आहे. यात ग्रीन बिल्डिग, घरे आणि विविध क्षेत्राच्या डिझाइन आणि देखभाल यांचा यात समावेश आहे. इमारत, मालक यांना पर्यावरणास जबाबदार राहण्यास आणि कार्यक्षमतेने संसाधने वापरण्यास मदत करते.

एलर्इईडी प्रमाणपत्रासाठी आवश्यक बाबी
१) वास्तूचे ठिकाण आणि वाहतूक
२) सार्इटची शाश्वतता
३) पाण्याची कार्यक्षमता
४) ऊर्जा आणि वातावरण
५) बांधकामातील साहित्य आणि संसाधने
६) घरातील पर्यावरणीय गुणवत्ता
७) नाविन्यता
८) स्थानिक बाबींची मागणी