पुण्यात सोमवारी ‘हॉर्न ठेवा बंद’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात सोमवारी
‘हॉर्न ठेवा बंद’
पुण्यात सोमवारी ‘हॉर्न ठेवा बंद’

पुण्यात सोमवारी ‘हॉर्न ठेवा बंद’

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः लाइफ सेव्हिंग फाउंडेशन, पुणे पोलिस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने ‘नो हाँकिंग डे’ अर्थात पुण्यात हॉर्न ठेवा एक दिवस बंद अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून सोमवारी (ता. १२) पुण्यातील विविध प्रमुख चौकांमध्ये एकाच वेळी नो हाँकिंग डे उपक्रम होणार आहे, अशी माहिती लाइफ सेव्हिंग फाउंडेशनचे देवेंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू, प्रा. पद्माकर पुंडे आदी उपस्थित होते. १२ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील विविध चौकांमध्ये ही मोहीम पार पाडली जाईल. तसेच टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे.

आयोजक म्हणतात
- पुण्यात साधारणतः दररोज एक कोटीपेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो
- यातील ९० टक्के हॉर्न हे अनावश्यक असतात
- त्यात वाहतूक कोंडीत तासंतास अडकल्यावर अशा अनावश्यक हॉर्नमुळे नागरिकांना बऱ्याचशा दुष्परिणामांना सामोरे जावे लागते
- नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रमाचे आयोजन
- पुण्यातील विविध प्रमुख चौकांमध्ये व पेट्रोलपंपांवर एकाच वेळी जनजागृती

सध्या पुणे हे एकमेव असे शहर आहे जिथे वाहनांची संख्या ही लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, वाढत्या ध्वनिप्रदूषणात हॉर्नचा आवाज प्रमुख कारण आहे. त्याचप्रमाणे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हृदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा देखील सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी नो हॉर्न संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे.
- मकरंद टिल्लू, नवचैतन्य हास्ययोग परिवार