विद्यापीठाचे तीन वर्षांत दीडशेहून अधिक करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाचे तीन वर्षांत 
दीडशेहून अधिक करार
विद्यापीठाचे तीन वर्षांत दीडशेहून अधिक करार

विद्यापीठाचे तीन वर्षांत दीडशेहून अधिक करार

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या तीन वर्षांत १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संस्थांसमवेत सामंजस्य करार केले आहेत. याचा लेखाजोखा कुलगुरूंच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी मांडला.
रोजगाराभिमुख शिक्षण, उद्योगांशी समन्वय, संशोधन आणि संशोधनातून तंत्रज्ञान विकास यासाठी हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांशी विद्यापीठाने करार केले आहेत. आंतरराष्ट्रीय करारामध्ये विद्यापीठाने हार्वर्ड बिझनेस स्कूल, मेलबर्न युनिव्हर्सिटी, द युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे सिटी कॉलेज याबरोबरच जपान, ऑस्ट्रिया, फ्रान्स, ग्रीस, जर्मनी, नॉर्वे, लंडन, अमेरिका, पोलंड अशा देशात असणाऱ्या विद्यापीठ आणि तेथील नामांकित शैक्षणिक संस्थांशी करार केले आहेत. तर राष्ट्रीय पातळीवर इस्रो, मारुती सुझुकी, चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट, आयबीएम इनोव्हेशन सेंटर, आयुष इन्स्टिट्यूशन, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी, सिरम इन्स्टिट्यूट, एएफएमसी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, सेंटर फॉर मटेरिअल फॉर इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी अशा संस्थांसमवेत करार केले आहेत.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कराराच्या माध्यमातून शैक्षणिक देवाण-घेवाण, संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान यात अधिकाधिक चांगल्याप्रकारे काम करणे शक्य झाले आहे. ॲकॅडमिक क्रेडिट बँक, बहुसंस्था धोरण, उद्योग क्षेत्राशी संबंध, संशोधन याचा फायदा विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांना होणार आहे.
- डॉ. कारभारी काळे, प्रभारी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ