Sat, March 25, 2023

जुना कात्रज घाट ३१ पर्यंत बंद राहणार
जुना कात्रज घाट ३१ पर्यंत बंद राहणार
Published on : 5 December 2022, 1:57 am
पुणे, ता. ५ : कात्रज-शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ (जुना कात्रज घाट) घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाच्या मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत सातारा ते पुणे जुन्या कात्रज घाटातून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद करून ती नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
पुणे ते सातारा अशी कात्रज घाटातून एकेरी वाहतूक सुरु आहे. वाहनधारकांनी साताऱ्याकडून पुण्याकडे येताना नवीन बोगद्यातून यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता बी. एन. बहिर यांनी केले आहे. सुमारे आठ किलोमीटर लांबीच्या घाट रस्त्याची दुरुस्ती या दरम्यान करणार आहे.