दुचाकी चोरास सहा महिने सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी चोरास सहा महिने सक्तमजुरी
दुचाकी चोरास सहा महिने सक्तमजुरी

दुचाकी चोरास सहा महिने सक्तमजुरी

sakal_logo
By

पुणे : खराडी परिसरातून दुचाकी चोरणाऱ्याला न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी हा निकाल दिला.
समाधान गणपत जगताप (वय २८, रा. यवत) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत दुचाकी मालकाने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादींची दुचाकी २४ जुलै २०२० रोजी खराडीतील एका हॉटेलसमोरून चोरीला गेली होती. पोलिसांनी त्याचा तपास करून आरोपी समाधान जगतापला अटक केली. जगताप याने चोरलेली दुचाकी यवत परिसरातील एका जंगलात लपवून ठेवली होती. या खटल्यात सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे तीन साक्षीदार तपासले. सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. पोलिस नाईक प्रदीप धुमाळ यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पोलिस हवालदार राहुल शिंदे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास पंधरा दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असे निकालपत्रात नमूद केले आहे.