लेखक शिवराज गोर्ले यांचे शनिवारी व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेखक शिवराज गोर्ले यांचे शनिवारी व्याख्यान
लेखक शिवराज गोर्ले यांचे शनिवारी व्याख्यान

लेखक शिवराज गोर्ले यांचे शनिवारी व्याख्यान

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : मजेत जगावं कसं? यशस्वी व्हावं कसं? तुम्ही बदलू शकता, अशा अनेक प्रेरक साहित्याचे दालन सुरू करणारे
लोकप्रिय लेखक शिवराज गोर्ले यांचे ‘यशाचे तंत्र, आनंदाचा मंत्र’ या विषयावर पुणेकरांना शनिवारी (ता. १०) व्याख्यान ऐकता येईल. निमित्त आहे ते गोर्ले यांच्या ‘मी कमलेश कोठुरकर’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन.

‘सकाळ प्रकाशना’तर्फे शनिवारी सायंकाळी सहा वाजता टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नीतू मांडके सभागृहामध्ये या आत्मकथनात्मक कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्त यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे कादंबरीविषयी मार्गदर्शन करणार आहेत. उद्योगविश्‍वात, व्यवस्थापन क्षेत्रात झगमगते करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हे आत्मकथन म्हणजे एक पर्वणीच ठरावी. त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकाळ प्रकाशनाकडून करण्यात आले आहे.

कार्यक्रमाविषयी...
कार्यक्रम ः पुस्तक प्रकाशन, व्याख्यान
स्थळ ः नीतू मांडके सभागृह, आयएमए, टिळक रस्ता
कधी ः शनिवार (ता. १०)
वेळ ः सायंकाळी ६ वाजता