कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचाऱ्यांना मारहाण 
करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोंढवा येथील चार आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

महावितरणच्या रास्तापेठ विभागांतर्गत कोंढवा शाखा कार्यालयाचे जनमित्र शंकर रामकिसन रोंढे हे सहकारी सिद्धार्थ चव्हाण यांच्यासमेवत सोमवारी (दि. ५) कोंढवा येथील भाग्योदयनगर परिसरात दुपारी वीजबिलांची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे सरकारी कर्तव्य बजावत होते. यामध्ये हजरा कॉम्प्लेक्समधील चार घरगुती थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मीटर काढून दोघेही कर्मचारी कार्यालयाकडे निघाले होते. मात्र, कोंढवा येथील अफजल कादर कपाडिया, असिफ कादर कपाडिया, मोहमद अफजल कपाडिया व एक अनोळखी इसम यांनी जनमित्र रोंढे व चव्हाण यांना अडवून वीजमीटर हिसकावून घेतले व दोघांनाही मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. महावितरणच्या दोन्ही कर्मचाऱ्यांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून चारही जणांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.