Sun, Jan 29, 2023

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात
अटकपूर्व जामीन नामंजूर
ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नामंजूर
Published on : 7 December 2022, 3:23 am
पुणे, ता. ७ : मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ केली म्हणून दाखल असलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी हा आदेश दिला. ज्ञानेश आनंदराव ढमढेरे आणि संतोष संभाजी पवार असे जामीन फेटाळण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सुनील बलराम भवरे यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींनी सहा ऑक्टोबर २०२१ रोजी भवरे यांना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार देण्यात आली आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपींनी अर्ज केला होता. त्याला सरकारी वकिलांनी विरोध केला. ॲड किशोर पाटील, ॲड. विष्णू धावरे व ॲड. शरद नरोटे यांनी मुळ फिर्यादीतर्फे कायदेशीर बाजू मांडली.