हवेलीच्या तहसीलदार कोलते पाटील निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हवेलीच्या तहसीलदार
कोलते पाटील निलंबित
हवेलीच्या तहसीलदार कोलते पाटील निलंबित

हवेलीच्या तहसीलदार कोलते पाटील निलंबित

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : हडपसर येथील वनजमीन तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाची खातरजमा न करता संबंधित अर्जदाराला प्रदान करणे, करोना काळात जीवनावश्यक वस्तुंची खरेदी आणि आवश्यक सेवासुविधा यांमध्ये वित्तीय अनियमितता, पुणे शहराच्या तहसीलदार असताना कोलते यांनी नियमबाह्य पद्धतीने कामकाज आणि निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्राप्त गंभीर तक्रारींचा ठपका ठेवून हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्यावर शुक्रवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश राज्य सरकारमधील अतिरिक्त सचिव संजीव राणे आणि डॉ. माधव वीर यांनी दिले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दोन फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अहवालावरून कोलते यांनी हडपसर येथील सर्वेक्षण क्रमांक ६२ या जमिनीबाबतच्या तत्कालीन महसूल मंत्री यांच्या आदेशाची खातरजमा न करता तसेच शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्हाधिकारी यांचे अभिप्राय, आदेश प्राप्त न करता कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन संबंधित अर्जदारास राखीव वन संवर्गातील जमीन प्रदान केल्याचा आदेश १२ जुलै २०२१ रोजी दिला होता. तसेच विभागीय आयुक्त राव यांच्या २३ मे रोजीच्या अहवालात कोलते यांनी करोना काळात जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना आणि आवश्यक सेवासुविधा प्राप्त करून घेताना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या सरकारी निर्णयातील तरतुदींचा अवलंब न करता वित्तीय अनियमितता केल्याचे निदर्शनास आले. तसेच पुणे शहराच्या तहसीलदार असताना प्रकाश बिजलानी व इतर यांच्या प्रकरणात नियमबाह्य पद्धतीने कामकाज केले. तृप्ती कोलते पाटील यांच्याविरुद्ध निवडणूकविषयक कामकाजाबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कोलते यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे. हडपसर वनजमीन प्रकरणात यापूर्वी एकाला अटक करण्यात आली आहे.

किरण सुरवसे यांची नियुक्ती
दरम्यान, हवेली तहसीलदार म्हणून किरण सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरवसे यांनी १२ डिसेंबरपर्यंत या पदाचा कार्यभार स्वीकारावा, असेही आदेशात म्हटले आहे.