संतुलित बदलासाठी स्वास्‍थ्यम् मार्गदर्शक ः अभिजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संतुलित बदलासाठी स्वास्‍थ्यम् मार्गदर्शक ः अभिजित पवार
संतुलित बदलासाठी स्वास्‍थ्यम् मार्गदर्शक ः अभिजित पवार

संतुलित बदलासाठी स्वास्‍थ्यम् मार्गदर्शक ः अभिजित पवार

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः यम ते संयमापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा करायचा, याबद्दलचे मार्गदर्शन स्वास्थ्यम् उपक्रमातून आम्ही सांगू पाहतो आहे. मन संतुलित असले पाहिजे, हे खरे; मात्र ते करायचे कसे याबद्दल स्वास्थ्यम् उपक्रम मार्गदर्शक ठरणारा आहे. त्यासाठीची मनाची शुद्धता, एकाग्रता, ध्यान अशा अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शनाची आवश्यकता असते. ती स्वास्थ्यम् पूर्ण करेल. या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीराम पंचायतन मूर्तीची पूजा करण्याचा उद्देशच मुळी आपण शुद्ध मनाने सहभागी होण्याचा आहे.
आज तुमचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत. त्यातून तुमची आणि जे तुमचे विचार ऐकणार आहेत, त्यांचीही वाक् शुद्धीतून भक्ती वाढवायची आहे. महर्षी शांडिल्य यांनी ध्यान, आत्मचिंतनाने मनाची शुद्धी केली पाहिजे, असे सांगितले आहे. त्यासाठी सर्व स्तरांवर काम करण्याची गरज आहे. दुराभिमान आणि द्वेष संपवून आपला आत्मशोधाचा प्रवास सुरू व्हावा आणि तीच आपली जीवनशैली ठरावी, अशी या उपक्रमातून आमची अपेक्षा आहे. असे प्रास्ताविकात अभिजित पवार यांनी सांगितले.
डॉ. कुमार विश्वास यांचे कौतुक करताना श्री. पवार म्हणाले, ‘आपल्या वाणीवर सरस्वती विराजमान आहे. आपली वाणी प्रसंगी देवर्षी नारदांचे रूप धारण करते. देवर्षी नारद त्रिखंडात संचार करायचे आणि त्रिखंडात त्यांचा मित्रपरिवार होता. प्रसंगी ते खोडकरही होते. आम्हाला तुमच्या वाणीमध्ये आणि वर्तनात देवर्षींच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते. या विचारातून अर्धमाचा नाश आणि धर्माच्या शिकवणीवर पुढे जाता येते.
समाजात जी अस्वस्थता निर्माण झाली आहे, या शिकवणीचा विसर पडला आहे. याची पुन्हा जाणीव करून देण्याची गरज आहे. आपली जीवनशैली कशी जगावी, मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न आणि मनातून परिवर्तन करण्यासाठी, समाजात, प्रत्येक व्यक्ती सुख, शांतीकडे जावा हा उपक्रमाचा हेतू आहे, असेही श्री. पवार यांनी नमूद केले.