
भोसरी परिसरासाठी दोन पॉवर रोहित्र
पुणे, ता. ११ : भोसरी एमआयडीसीमधील उद्योगांसह भोसरी गाव, नाशिक रोड, दिघी या परिसरातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी सेन्चुरी इन्का २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रात प्रत्येकी ५० एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त दोन नवीन पॉवर रोहित्र बसविण्याचा निर्णय महापारेषणने घेतला आहे. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार आणि महापारेषणचे राजेंद्र गायकवाड यांनी भोसरी येथील महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रासह इतर वीजयंत्रणेची संयुक्तपणे पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता सतीश राजदीप, सतीश गायकवाड व भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले उपस्थिती होते. भोसरी विभाग अंतर्गत भोसरी उपविभागामध्ये दिघी व इंद्रायणीनगरमध्ये, तर आकुर्डी उपविभागामध्ये चिखली येथे नवीन शाखा कार्यालयांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करून तो मुख्यालयाकडे मान्यतेसाठी पाठविण्याबाबतच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.