जिल्हा परिषदेत आज ‘तांदूळ महोत्सव’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेत आज
‘तांदूळ महोत्सव’
जिल्हा परिषदेत आज ‘तांदूळ महोत्सव’

जिल्हा परिषदेत आज ‘तांदूळ महोत्सव’

sakal_logo
By

पुणे, ता. १० : ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पुणे जिल्हा परिषदेमार्फत येत्या सोमवारी (ता. १२) तांदूळ महोत्सव आयोजित केला आहे. जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीत हा महोत्सव होईल.
या महोत्सवात जिल्ह्यातील वेल्हा, मुळशी, मावळ, आंबेगाव, भोर, हवेली, खेड, पुरंदर व जुन्नर या तालुक्यातील महिला स्वयंसहाय्यता समूह सहभागी होणार आहेत. यामध्ये पुणेकरांना अस्सल इंद्रायणी सेंद्रिय तांदूळ आणि त्याचबरोबर कोलम, वाडा कोलम, आंबेमोहोर, काळा तांदूळ, बासमती स्थानिक वाणाचा दप्तरी आदी विविध प्रकारचा तांदूळ खरेदी करता येईल, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.