विद्येच्या प्रांगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्येच्या प्रांगणात
विद्येच्या प्रांगणात

विद्येच्या प्रांगणात

sakal_logo
By

विद्येच्या प्रांगणात

‘विद्या प्रसारिणी’चा वर्धापन दिन उत्साहात
पुणे, ता. ११ : विद्या प्रसारिणी सभेच्या वर्धापन दिन विद्यावर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमात सभेचे सहकार्यवाह डॉ. सतीश गवळी, विजय भुरके, विशाखा भुरके, साधना कुदळे, मृणालिनी गरवारे, भारत इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या उज्ज्वला पिंगळे, विद्यावर्धिनी शाळेच्या प्राचार्या रेणू सुंबाली, हरी पुरंदरे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक लता घोलप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुंबाली यांनी केले.

अभिनवमध्ये वार्षिक क्रीडा दिन उत्साहात
पुणे, ता. ११ : आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र गोकुळे उपस्थित होते. कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, खजिनदार ध्रुव जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाने मॅटवरील कुस्ती आणि मल्लखांबावरील चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली. रिले रेस, धावणे, बॉल पासिंग, अडथळा शर्यत, मल्लखांब, फायर जंप अशी प्रात्यक्षिके करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमुदिनी घोरपडे यांनी केले.