‘ग. दि. मा. स्मृतिवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ग. दि. मा. स्मृतिवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन
‘ग. दि. मा. स्मृतिवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

‘ग. दि. मा. स्मृतिवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

sakal_logo
By

‘ग. दि. मा. स्मृतिवंदना’चे आयोजन

पुणे, ता. ११ ः ‘जन्मतःच मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या बालकाने म्हणजेच ग. दि. मा. यांनी पुढे गीतरामायणासारखी अजरामर गीतरचना करून आपले जीवन सार्थ केले’, अशी भावना गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर यांनी नुकतीच व्यक्त केली. स्वरगायत्री प्रतिष्ठानतर्फे ग. दि. माडगूळकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित ‘ग. दि. मा. स्मृतिवंदना’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गायिका चारुशीला बेलसरे यांनी गदिमांच्या ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती’, ‘दशरथा घे हे पायस दान’, ‘राम जन्मला गं सखे’ आदी गीतरचनांचे गायन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांना संवादिनीवर सुभाष मालेगावकर आणि तबल्यावर संजय पारखी यांनी साथसंगत केली. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर यांनी निवेदन केले.

ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांचे व्याख्यान
पुणे, ता. ११ ः ‘‘आपल्या मनाची शक्ती ज्यावेळी वाढेल, त्यावेळी आपल्यासाठी हे जग बदललेले असेल. इतरांच्या कृतीमुळे आपण विचलित होतो, याचा अर्थ आपण आपल्या मनाचे नियंत्रण इतरांच्या हाती दिलेला असतो. हे बदलण्यासाठी ईश्वरीय शक्तीसह जोडले जाऊन आपण स्वतः शक्तिशाली होऊ, तेव्हा आपला कंट्रोल आपल्याच हाती असेल’’, असा सल्ला अध्यात्मिक मार्गदर्शिका ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांनी दिला. ‘स्वर्णिम विचाराने स्वर्णिम संसार’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. याप्रसंगी जगदंबा भवनच्या निर्देशिका सुनंदा दीदी, मीरा सोसायटी सेवा केंद्र संचालिका नलिनी दीदी, वरिष्ठ प्रवक्ता बीके दशरथ भाईजी, इंदोरच्या पूनम दीदी, डॉ. राजीव चव्हाण, राजेंद्र भाटिया, ॲड. पांडुरंग थोरवे, विठ्ठलराव देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री दीदी यांनी केले.