पुणे प्रादेशिक विभाग ः औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश वीजचोरीच्या १७५ प्रकरणे उघडकीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे प्रादेशिक विभाग ः औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश 

वीजचोरीच्या १७५ प्रकरणे उघडकीस
पुणे प्रादेशिक विभाग ः औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश वीजचोरीच्या १७५ प्रकरणे उघडकीस

पुणे प्रादेशिक विभाग ः औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश वीजचोरीच्या १७५ प्रकरणे उघडकीस

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : महावितरणच्या भरारी पथकाने नोव्हेंबर महिन्यात पुणे प्रादेशिक विभागात तीन कोटी ५६ लाख ६० हजार रुपयांची १७५ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. उघडकीस आणलेल्या वीजचोरीमध्ये मोठया प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. तर चार प्रकरणात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

वीजचोरी विरोधात शोध मोहीम राबविण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहे. त्यानुसार सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमीत कुमार यांनी पुणे प्रादेशिक विभागात राबविलेल्या मोहिमेत ही कारवाई केली. पुणे ग्रामीण भागातील उरुळीकांचन परिसरात रात्रीच्यावेळी भरारी पथकाने धाड टाकून पेट्रोल पंपाची वीजचोरी उघडकीस आणलेली आहे. व्यावसायिक ग्राहकांनी मीटरला जंपर टाकून बायपास करून वीजचोरी करण्याची तरतूद केलेली होती. ग्राहकांस ९० हजार १७९ युनिटचे १९ लाख ४२ हजार १८२ रुपयांचे वीजचोरीचे बिल दिले आहे. तर दुसऱ्या प्रकरणात पुणे शहर भागातील ८० केडब्ल्यु जोडभार असलेल्या व्यावसायिक ग्राहकांची वीजचोरी पकडली. या व्यावसायिक ग्राहकांनी मीटरच्या आधी एल. टी. केबलला टॅप करून मीटर बायपास करून वीजचोरी केलेली होती. ग्राहकांनी ८० हजार ४३८ युनिट्सची चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून त्यांना २८ लाख १४ हजार रुपयांचे वीजचोरीचे बिल दिले आहे. कोल्हापूरमधील इचलकरंजी भागातील ९१ एच. पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकांची वीजचोरी उघडकीस आलेली आहे. औद्योगिक ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले. ९० हजार २०८ युनिट्स चोरी केल्यामुळे त्यांना १५ लाख २१ हजार ७१० रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले आहे.
वीजबिल न भरल्यास कारवाई करू’
सोलापूरमधील नातेपुते भागातील ६० एच. पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकांची वीजचोरी उघडकीस आली आहे. औद्योगिक ग्राहकांनी दुसऱ्या डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मरवरून एल. टी. केबल टाकून मीटर बायपास करून वीजचोरी केल्यामुळे त्यांना ६९ हजार ५५५ युनिट्सची वीज चोरी केली. त्यामुळे ११ लाख ५५ हजार ३०० रुपयांचे वीजचोरीचे बिल दिले आहे. वीजचोरीची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नियमानुसार मुदत दिली आहे. मुदतीच्या कालावधीत या ग्राहकांनी वीजबिलाची रक्कम भरली नाही, तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.