Tue, Jan 31, 2023

लघुपटांच्या माध्यमातून
कचरावेचकांच्या जीवनप्रवासावर प्रकाश
लघुपटांच्या माध्यमातून कचरावेचकांच्या जीवनप्रवासावर प्रकाश
Published on : 12 December 2022, 10:48 am
पुणे, ता. १२ ः कष्टकरी पंचायत ट्रस्टच्या वतीने शहरातील कचरा वेचकांच्या वैयक्तिक आणि संघटनात्मक संघर्ष आणि परिवर्तन घडविणाऱ्या लघुपटांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ‘मोल’ आणि ‘स्वच्छची गोष्ट’ या दोन लघुपटांचा समावेश आहे. ‘मोल’च्या माध्यमातून कचरा वेचकांचा संघर्षमय प्रवास, तर ‘स्वच्छची गोष्ट’ या लघुपटात देशभरातील सर्वांत मोठ्या कचरा वेचकांची पूर्ण मालकी असलेल्या सहकारी संस्थेच्या अडचणींवर मात करत केलेला खडतर प्रवास व त्यांनी मिळवलेले हक्क, यश याविषयीचा प्रवास पाहता येणार आहे. हे दोन्ही लघुपट पुण्यातील कचरा वेचकांच्या नेतृत्वाने आणि सहयोगाने बनविण्यात आले आहेत. हा कार्यक्रम बुधवारी (ता. १४) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत विधी महाविद्यालय (लॉ कॉलेज) रस्ता येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात होणार आहे.