‘सवाई’ महोत्सवातील संधी ऊर्जा देणारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सवाई’ महोत्सवातील संधी ऊर्जा देणारी
‘सवाई’ महोत्सवातील संधी ऊर्जा देणारी

‘सवाई’ महोत्सवातील संधी ऊर्जा देणारी

sakal_logo
By

पुण्यात येत्या १४ ते १८ डिसेंबरदरम्यान ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव होत आहे. यात प्रथम पदार्पण करणाऱ्या कलावंतांचे मनोगत जाणून घेऊया...

पंडित भीमसेन जोशींचा हा आशीर्वाद हिच ऊर्जा
- डॉ. अविनाश कुमार (तरुण गायक, दिल्ली विद्यापीठातील संगीत विभागात सहायक प्राध्यापक)
संगीतातील सूर्यच ज्यांना म्हणावे, अशा पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेल्या या महोत्सवात माझ्यासारख्या तरुण शास्त्रीय गायकाचे प्रथम पदार्पण, हा माझ्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहे. मीही त्यांच्या किराणा घराण्यातील गायकीची साधना करतो आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसात पसरावे, त्याची गोडी निर्माण व्हावी ; यासाठी मी प्रयत्न करतो आहे. त्यात परंपरेचे भान ठेवून नवे प्रयोग करण्याची ऊर्जा मला मिळावी. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील ही संधी मला ऊर्जा देणारी ठरेल.

या मंचावरील ही संधी माझे मनोबळ उंचावणारी
- यशस्वी सरपोतदार (तरुण गायिका, जयपूर-अत्रोली घराण्यातील)
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची थोरवी माहीत असल्याने, अशा ठिकाणी गायची संधी मिळते आहे ; या जाणिवेने मी भारावून गेले आहे. या महोत्सवातील अभिजातता, आजवर अनेक गुणी कलावंतांनी जपलेला याचा दर्जा, त्यांचे समर्पण आदींचे भान माझ्या मनात आहे. या सगळ्याला साजेशी प्रस्तुती देण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्या गुरू विदुषी पद्माताई तळवलकर यांनी या मंचावर सादरीकरण केले आहे. येथेच त्यांची शिष्या म्हणून माझ्या प्रथम पदार्पणाचा विलक्षण आनंद आहे. त्यांनी शिकवलेले या मंचावर सादर करण्याची ही संधी माझे मनोबळ उंचावणारी आहे.

शब्दांकन ः नीला शर्मा
१) यशस्वी सरपोतदार
२) डॉ. अविनाश कुमार
३) लोगो