Sun, Feb 5, 2023

गोंधळी लोककला महोत्सव जानेवारीत
गोंधळी लोककला महोत्सव जानेवारीत
Published on : 12 December 2022, 2:32 am
पुणे, ता. १२ ः भारतीय संस्कृतीचे संवर्धन व समाज संघटनेच्या वतीने ‘गोंधळी लोककला महोत्सवा’चे आयोजन जानेवारी २०२३ मध्ये करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी नुकतीच पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत दिली. या बैठकीत संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राहुल ढेंबे, सचिव मोहन भिसे, कोषाध्यक्ष संदिप काटे, रविंद्र ढेंबे आदी उपस्थित होते. बैठकीत बेघरांना घरे, लोककलावंतांना मानधन, रोजगार व व्यवसाय, आरक्षण या विषयी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्यात आला.