खाद्य खुराक महोत्सवाचे गांधीनगरला आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाद्य खुराक महोत्सवाचे 
गांधीनगरला आयोजन
खाद्य खुराक महोत्सवाचे गांधीनगरला आयोजन

खाद्य खुराक महोत्सवाचे गांधीनगरला आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः खीमाशिया असोसिएट्सच्या वतीने १९ वा खाद्य खुराक महोत्सव येत्या १५ ते १८ डिसेंबर या कालावधीत आयोजित केला आहे. गांधीनगर येथील हेलिपॅड ग्राऊंडवर हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाला भेट देणाऱ्यांना भारतीय खाद्य इंडस्ट्रीबाबत तसेच डेअरी उत्पादने याबाबत अद्ययावत माहिती मिळणार आहे.

फापडा मशिन्स, खाक्रा मशिन्स, चपाती मशिन्स, बासुंदी मशिन्स, रसगुल्ला मशिन्स, स्वीटस् मशिन्स या फूड प्रक्रियेतील मशिन्सची निर्मिती आणि पॅकेजिंगबाबत माहिती मिळणार आहे. या महोत्सवात रोबोट भारतीय खाद्यान्न आणि ते कसे सर्व्ह करायचे याबाबत माहिती देईल. हा महोत्सव भारतीय खाद्य संस्कृतीतील एक मैलाचा दगड ठरेल, असा आयोजकांना आत्मविश्वास आहे. आईस्क्रीम, बेकरी पदार्थ, स्विटस्, रेस्टॉरंट, फरसाण, चॉकलेट, गृहउद्योग, सेंद्रिय अन्न, आरोग्यदायी खाद्ये, पॅकेजिंग, निमिर्ती प्रकल्प, मशिनरी आणि अद्ययावत तंत्रज्ञान यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. हा महोत्सव नवीन डिलर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स यांना नवीन माहिती मिळण्याची एक सुवर्णसंधी देणारा असल्याचे आयोजकांनी सांगितले. कोणीही ही संधी दवडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.