‘संचेती’ने साजरा केला ५७ वा वर्धापन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘संचेती’ने साजरा केला 
५७ वा वर्धापन दिन
‘संचेती’ने साजरा केला ५७ वा वर्धापन दिन

‘संचेती’ने साजरा केला ५७ वा वर्धापन दिन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : संचेती रुग्णालयाने त्यांचा ५७ वा वर्धापन दिन साजरा केला. संचेती समुहाने १९६५ पासून अस्थिरोगाच्या विविध रुग्णांवर उपचार केले आहेत. ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांनी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेऊन रूग्णालयाचा पाया अत्यंत काळजीपूर्वक उभारला. या प्रसंगी डॉ. के. एच. संचेती म्हणाले, ‘‘रुग्णाला सर्वांगीण आणि परवडणारे उपचार देणे हा या रुग्णालयाचा मुख्य उद्देश आहे.’’ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पराग संचेती म्हणाले, ‘‘प्रत्येक वर्षात संचेती रुग्णालयाला यश मिळाले आणि प्रत्येक दशकाने आमच्या प्रवासात एक मैलाचा दगड रचला आहे. हे सर्व विश्वासाशिवाय शक्य झाले नसते. आम्ही तुमची मनापासून दाद देतो.’’ सध्या, संचेती रुग्णालय हे पोस्ट ग्रॅज्युएट स्पेशलायझेशनमधील सर्वात मोठे ‘ऑर्थोपेडिक सिंगल स्पेशॅलिटी’ रुग्णालय आहे.