पुणे परिसरात आज पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे परिसरात आज
पावसाची शक्यता
पुणे परिसरात आज पावसाची शक्यता

पुणे परिसरात आज पावसाची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तापमानात कमालीची वाढ झाली आहे. तर मंगळवारी (ता. १३) शहर आणि परिसरात पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
रविवारी (ता. ११) पुण्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती. तर सोमवारी (ता. १२) दिवसभर ढगाळ वातावरणाचे सावट कायम होते. दुपारनंतर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या मध्यम सरींनी हजेरी लावली होती. तर शहरात २०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. महत्त्वाचे म्हणजेच सरासरीपेक्षा तापमानात तब्बल नऊ अंशांनी वाढ झाली होती. दरम्यान पुढील दोन दिवसानंतर शहरात पुन्हा निरभ्र वातावरणाची शक्यता आहे. तर मंगळवारी (ता. १३) पुणे व परिसरात पाच ते १० मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान पुढील दोन दिवस २० अंशांच्या घरात नोंदले जाऊ शकते. राज्यात ही पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरातून होत असलेला बाष्पपुरवठा यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होत तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. तर मंगळवारी (ता. १३) मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कायम आहे.

वाशीम नीचांकी १३ अंश
सोमवारी (ता. १२) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद वाशीम येथे १३ अंश सेल्सिअस, तर सर्वाधिक कमाल तापमान ३८.५ अंश सेल्सिअस यवतमाळ येथे नोंदले गेले. ढगाळ वातावरणामुळे राज्यातील तापमानात ही वाढ होत आहे. राज्यात विविध ठिकाणी सरासरीपेक्षा कमाल तापमानात ४ ते १० अंशांनी वाढ झाली आहे. मात्र कमाल तापमानात घट झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे.