मध्यवर्ती पुण्यातील रस्ते आज बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्यवर्ती पुण्यातील रस्ते आज बंद
मध्यवर्ती पुण्यातील रस्ते आज बंद

मध्यवर्ती पुण्यातील रस्ते आज बंद

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी विविध राजकीय पक्ष संघटनांकडून मंगळवारी (ता. १३) बंद पुकारण्यात आला आहे. त्यानिमित्त पक्ष व संघटनांकडून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला आहे.

हे लक्षात ठेवा
- मोर्चाला मंगळवारी सकाळी नऊ वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून सुरुवात
- मोर्चा टिळक चौकातून लक्ष्मी रस्त्यावरून उलट दिशेने बेलबाग चौक, डावीकडे वळून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने जाऊन जिजामाता चौक येथील लाल महाल चौकात येणार
- तेथेच या मोर्चाचा समारोप
- डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल

मोर्चाच्या कालावधीत मार्गावरील वाहतूक परिस्थिती पाहून बंद करण्यात येणार. वाहनचालकांनी टिळक रस्ता, केळकर रस्ता व कुमठेकर रस्त्याचा वापर करून इच्छितस्थळी जावे.
- विजय मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

आज बंद असणारे रस्ते
* लक्ष्मी रस्ता ः सोन्या मारुती चौक ते टिळक चौक
* छत्रपती शिवाजी महाराज रस्ता ः स.गो.बर्वे चौक ते बेलबाग चौक
* बाजीराव रस्ता ः पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक
* गणेश रस्ता ः फडके हौद चौक ते जिजामाता चौक
* केळकर रस्ता ः अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक

पर्यायी मार्ग
नेहरू रस्त्यावरील नरपतगिरी चौकातून १५ ऑगस्ट चौकाकडे, पॉवर हाऊस चौकातून केईएम रुग्णालयाकडे, संत कबीर चौकातून लक्ष्मी रस्त्याने पुढे. पीएमपीएल बसची वाहतूक आवश्‍यकतेप्रमाणे सेव्हन लव्हज हॉटेलजवळील चौक ते मालधक्का चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.