पिंपरी पोलिसांनी दखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी पोलिसांनी दखल 
केलेले गुन्हे मागे घ्यावेत
पिंपरी पोलिसांनी दखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत

पिंपरी पोलिसांनी दखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : रिपब्लिकन पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. परंतु, मित्रपक्षाकडून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधाने करण्यात येत आहेत. हे प्रकार न थांबल्यास पक्षातून बाहेर पडून केवळ आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करू, असा इशारा माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिला आहे. तसेच, पिंपरी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे गृह विभागाने मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

या संदर्भात डॉ. धेंडे यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना पत्र लिहिले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल या महापुरुषांनी भीक मागून संस्था उभ्या केल्याचे आक्षेपार्ह विधान केले. याप्रकरणी पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. परंतु पोलिसांनी संबंधित व्यक्तींवर चुकीचे गुन्हे दाखल केले असून, ते तत्काळ मागे घ्यावेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे विधान करणाऱ्यांसोबत काम करणे अवघड आहे. आपल्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. परंतु मित्र पक्षाचे नेते चुकीचे विधान करत असून, ते योग्य नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून पिंपरी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, असे डॉ. धेंडे यांनी पत्रात म्हटले आहे.