
ओसवाल वूलनच्या गरम कपड्यांसाठी ग्राहकांची गर्दी
पुणे, ता. १३ : थंडी वाढत असल्यामुळे ओसवाल वुलन सेलने सादर केलेले उत्कृष्ट दर्जाचे उबदार आणि फॅशनेबल कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
या सेलमध्ये महिला, पुरुष आणि मुलांसाठी उत्तम दर्जाचे हिवाळ्यातील कपडे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिले जातात. सुप्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे सर्व प्रकारचे हिवाळ्यातील पोशाख रविवार पेठेतील मनीष मार्केटच्या बाजूला अग्रसेन भवनजवळील ‘ओसवाल वुलन’च्या सेलमध्ये आकर्षक किमतीत खरेदी करता येतील. यामध्ये जॅकेट, शाल, स्वेटर आणि विंड चीटर्सचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. स्टॉल १०० रुपयांपासून तर, उत्कृष्ट दर्जाचे दोन ब्लँकेटस् ५०० रुपयांपर्यंत आहेत. तसेच पुलओव्हर, कार्डिगन, लेगिंन्स, कढाइ, कुर्त्या, इनरसेट, किड्स लोवर, टी-शर्ट, ट्रॅक पँट किफायतशीर किमतीत आहेत. लेडीज शॉल्समध्ये अनेक प्रकार असून काश्मिरी शाल आणि शुद्ध लोकरीच्या शालीला ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. तसेच स्वेटर्स, लेडीज अँड जेंट्स हूडी, जॅकेट, रिव्हर्सिबल पुलओवर, पोंचू, नी कॅप, ट्रॅव्हलिंग लोही, वुलन क्रॉप टॉप आदींचेही शेकडो प्रकार आहेत. हा सेल सकाळी १० ते रात्री ९. ३० पर्यंत खुला असेल आणि रविवारीही सुरू असेल.