‘पीओजीएस’तर्फे शल्य कौशल्यावर वैज्ञानिक परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीओजीएस’तर्फे शल्य 
कौशल्यावर वैज्ञानिक परिषद
‘पीओजीएस’तर्फे शल्य कौशल्यावर वैज्ञानिक परिषद

‘पीओजीएस’तर्फे शल्य कौशल्यावर वैज्ञानिक परिषद

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : युवा स्त्रीरोग तज्ज्ञांच्या शस्त्रक्रिया कौशल्यांना अद्ययावत करण्याच्या उद्देशाने ‘पुणे ऑबस्टेट्रिक अॅण्ड गायनेकोलॉजिकल सोसायटी’तर्फे (पीओजीएस) शल्य कौशल्य या दोन दिवसीय वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला ३५० हून अधिक शल्यचिकित्सकांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस) कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आणि प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शैलेश पुणतांबेकर प्रमुख पाहुणे होते. ‘पीओजीएस’चे अध्यक्ष डॉ. पराग बिनीवाले, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद दुगड, सचिव डॉ. आशिष काळे, खजिनदार डॉ. चैतन्य गणपुले, क्लिनिकल सेक्रेटरी डॉ. मंजिरी वळसंगकर आणि समन्वयक डॉ. पंकज सरोदे उपस्थित होते. डॉ. पुणतांबेकर म्हणाले, “नवीन पिढीपर्यंत कौशल्य पोचण्यासाठी कोणत्याही शस्त्रक्रियेचे अनुकरण करणे शक्य झाले पाहिजे. पुणे शहरात अनेक उच्च दर्जाचे शल्यचिकित्सक आहेत, परंतु आपण जे काही करतो ते दस्तऐवजीकरण करून प्रकाशित करणे गरजेचे आहे, तसे केले नाही, तर आपले ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहचू शकणार नाही.” डॉ. कानिटकर म्हणाल्या, “वैद्यकशास्त्राद्वारे रुग्णांना बरे करण्याची कला आपण जोपासत आलो आहोत आणि यापुढे देखील यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. मनापासून आपल्या रुग्णांची काळजी घेत असताना त्यांच्याशी संवाद साधणे व दस्तऐवजीकरणही महत्त्वाचे असते.”