बेशिस्त चालकांना आता अध्यक्षांचा ‘ब्रेक’ ओमप्रकाश बकोरिया यांचा इशारा ः चालक बेशिस्त तर थेट ऑपरेटरवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेशिस्त चालकांना आता अध्यक्षांचा ‘ब्रेक’  

ओमप्रकाश बकोरिया यांचा इशारा ः  चालक बेशिस्त तर थेट ऑपरेटरवर कारवाई
बेशिस्त चालकांना आता अध्यक्षांचा ‘ब्रेक’ ओमप्रकाश बकोरिया यांचा इशारा ः चालक बेशिस्त तर थेट ऑपरेटरवर कारवाई

बेशिस्त चालकांना आता अध्यक्षांचा ‘ब्रेक’ ओमप्रकाश बकोरिया यांचा इशारा ः चालक बेशिस्त तर थेट ऑपरेटरवर कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः सिग्नल मोडणे, वेगाने वाहन चालविणे, प्रवाशांची हुज्जत घालणे, अशा प्रकरणात जर चालकाविषयी तक्रार प्राप्त झाली तर केवळ चालकांवरच नाही तर संबंधित चालकांच्या ऑपरेटरवरच कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पीएमपीच्या चालकाविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. सर्वाधिक तक्रारी या खासगी ठेकेदारांच्या बसवरील चालकांच्या बाबतीत आहेत. यात वेगाने वाहन चालविण्यापासून ते अपघातापर्यंतच्या कारणांचा समावेश आहे. त्यामुळे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी चालकांची वर्तणूक हा विषय गांभीर्यपूर्वक घेतला आहे. काही दिवसांपूर्वी हडपसर येथे ऑपरेटरच्या चालकाने सिग्नलला थांबलेल्या दुचाकीस्वार महिलेला पाठीमागून धडक दिली होती. संबंधित चालकाला तत्काळ बडतर्फ केले होते. त्यानंतर बेशिस्त चालकांना धडा शिकविण्यासाठी अध्यक्षांनी ऑपरेटरच कारवाई करण्याचे ठरविले आहे.


बेशिस्त चालकांमुळे पीएमपीचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता ज्या चालकाविरोधात तक्रारी प्राप्त होतील. त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. जर चालक हे ऑपरेटरचे असतील. तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे