केशकर्तनालय चालकावर शस्त्राने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केशकर्तनालय चालकावर शस्त्राने वार
केशकर्तनालय चालकावर शस्त्राने वार

केशकर्तनालय चालकावर शस्त्राने वार

sakal_logo
By

पुणे : पिण्यासाठी पाणी न दिल्याने केशकर्तनालय चालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (ता.११) कात्रज भागात घडली. या प्रकरणी तिनजणांवर गुन्हा दाखल केला.
स्वप्नील तावरे (वय २७, दुगड शाळेसमोर आंबेगाव खुर्द) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सोन्या कांबळे, गोविंद लोखंडे (दोघे रा. शनीनगर, आंबेगाव खुर्द) आणि साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तावरे यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तावरे यांचे शनीनगर परिसरात केशकर्तनालय आहे. आरोपी कांबळे, लोखंडे आणि साथीदार तावरे याच्या केशकर्तनालयात आले. त्यांनी तावरे याला पाण्याची बाटली पिण्यास मागितली. तावरे याने पाणी नसल्याचे आरोपींना सांगितेल. या कारणावरून आरोपी त्याच्यावर चिडले. कांबळे, लोखंडे आणि साथीदाराने तावरेला शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्याने तावरेचा गळा आणि डोक्यावर वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलिस उपनिरीक्षक कपले तपास करत आहेत.