महिलांची छेड काढणारा गुंड तडीपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांची छेड काढणारा गुंड तडीपार
महिलांची छेड काढणारा गुंड तडीपार

महिलांची छेड काढणारा गुंड तडीपार

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : महिलांची छेड काढणाऱ्या गुंडाला पोलिसांनी एक वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. नवनाथ गिरी (वय १९, रा. दुर्गा माता मंदिराजवळ, एकता चौक, खराडी) असे तडीपार केलेल्या गुंडाचे नाव आहे. गिरी याच्याविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात महिलांची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात त्याला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्याने पुन्हा महिलांची छेड काढण्याचे गुन्हे केले होते. त्याला शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, प्रशांत कापुरे, सागर कडू यांनी तयार केला. या प्रस्तावास पोलिस उपायुक्त बोराटे यांनी मंजुरी दिली. गिरी याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.