‘पुरुषोत्तम’ची महाअंतिम फेरी २४ डिसेंबरपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पुरुषोत्तम’ची महाअंतिम
फेरी २४ डिसेंबरपासून
‘पुरुषोत्तम’ची महाअंतिम फेरी २४ डिसेंबरपासून

‘पुरुषोत्तम’ची महाअंतिम फेरी २४ डिसेंबरपासून

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित ‘पुरुषोत्तम करंडक २०२२’ या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी येत्या २४ डिसेंबरपासून पुण्यात रंगणार आहे. पुण्यासह रत्नागिरी, कोल्हापूर, जळगाव-औरंगाबाद आणि अमरावती-नागपूर विभागातील १८ संघांमध्ये ‘पुरुषोत्तम’चा महाकरंडक पटकावण्यासाठी यावेळी चुरस रंगेल.
सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी पाच ते रात्री नऊ अशा दोन सत्रांमध्ये स्पर्धा होणार आहे. प्रत्येक सत्रात चार संघांचे सादरीकरण होणार आहे. तर, २६ डिसेंबरला सायंकाळच्या सत्रात बक्षीस वितरण समारंभ पार पडेल. पुणे व अमरावती-नागपूर विभागात सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचा करंडक कोणालाच न मिळाल्याने या विभागातून केवळ प्रथम तीन क्रमांकाचे संघ महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि जळगाव-औरंगाबाद विभागातून प्रत्येकी चार संघ महाअंतिम फेरीत दाखल झाले आहेत.

करंडक न देण्याचा ऐतिहासिक निर्णय
पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीत पुरुषोत्तम करंडक कोणालाही न देण्याचा ऐतिहासिक निर्णय परीक्षकांनी घेतला होता. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) या संघाच्या ‘कलीगमन’ या एकांकिकेला करंडक न देता केवळ प्रथम क्रमांक देण्यात आला होता. या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र करंडक मिळाला नसला तरी महाअंतिम फेरीत ‘पीआयसीटी’चा संघ तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती आणि मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय यांच्यासह संघ पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करेल.