इस्रोचे स्पेस ऑन व्हील प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इस्रोचे स्पेस ऑन
व्हील प्रदर्शन
इस्रोचे स्पेस ऑन व्हील प्रदर्शन

इस्रोचे स्पेस ऑन व्हील प्रदर्शन

sakal_logo
By

पुणे ः भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) स्पेस ऑन व्हील प्रदर्शनाचे कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूत आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. १९) सकाळी १० ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे प्रदर्शन पार पडणार आहे. या प्रदर्शनीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन एमआयटी स्कूल ऑफ पॉलिटेक्निकच्या प्राचार्या डॉ. रोहिणी काळे व विभाग प्रमुख डॉ. सुनील कराड यांनी केले आहे. इस्रोने विकसित केलेल्या स्पेस ऑन व्हील उपक्रमामध्ये हवामान तपासणे, नेव्हिगेशन सेवा वापरणे, दूरदर्शन पाहण्याचा समावेश आहे. तसेच वेगवेगळे उपग्रह प्रक्षेपण प्रणालीचे मॉडेल्स पाहता येईल. त्याचप्रमाणे भारताचा प्रथम उपग्रह आर्यभट्ट व भास्कर यांचा ही समावेश असेल. इस्रोने बांधलेले दोन उपग्रह ज्याने भारताचा प्रथम लो अर्थ ऑर्बिट पृथ्वी निरीक्षण उपग्रह बनविला आहे. त्याचप्रमाणे चांद्रयान आणि मंगलयान मिशनचे प्रक्षेपण सुद्धा दाखवले जाईल.