मारहाणीच्या विरोधात पशुवैद्यकांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाणीच्या विरोधात
पशुवैद्यकांचे आंदोलन
मारहाणीच्या विरोधात पशुवैद्यकांचे आंदोलन

मारहाणीच्या विरोधात पशुवैद्यकांचे आंदोलन

sakal_logo
By

पुणे ः पशुवैद्यकांना झालेल्या मारहाणीविरोधात सोमवारी (ता. २२) जनावरांची खासगी दवाखाने बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच रविवारपर्यंत शहरातील पशुवैद्यक काळ्या फिती लावून या मारहाणीचा निषेध नोंदविणार आहे. दवाखान्यात मांजर मृत्यूमुखी पडले म्हणून हडपसरचे पशुवैद्यक डॉ. रामनाथ ढगे यांना काही लोकांनी जबरदस्त मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ पुण्यातील पशुवैद्यकांनी आंदोलन पुकारले आहे. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात पेट डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेत ही माहिती देण्यात आली.