Mon, Jan 30, 2023

लाचखोर प्राप्तिकर अधिकाऱ्यास सक्तमजुरी
लाचखोर प्राप्तिकर अधिकाऱ्यास सक्तमजुरी
Published on : 15 December 2022, 4:44 am
पुणे, ता. १५ : प्राप्तिकर कार्यवाही निकाली काढण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात तत्कालीन प्राप्तिकर अधिकारी शेखर मधुकर खोमणे यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांनी हा आदेश दिला. चार डिसेंबर २०१८ रोजी हा प्रकार घडला. तक्रारदारांविरोधातील प्राप्तिकर कार्यवाही निकाली काढण्यासाठी खोमणे याने तक्रारदाराकडे एक लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारताना सीबीआयने सापळा रचून त्याला अटक करत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत १२ मार्च २०१९ रोजी त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.