पोलिस मेगासिटी निवडणुकीत जागृती पॅनेलचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस मेगासिटी निवडणुकीत जागृती पॅनेलचा विजय
पोलिस मेगासिटी निवडणुकीत जागृती पॅनेलचा विजय

पोलिस मेगासिटी निवडणुकीत जागृती पॅनेलचा विजय

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : लोहगाव येथील महाराष्ट्र पोलिस मेगासिटी सहकारी गृहरचना संस्थेच्या ‘जागृती’ पॅनेलचे सर्व १९ उमेदवार बहुमताने विजयी झाले. विरोधातील ‘क्रांती’ आणि ‘सावधान’ या दोन्ही पॅनेलचा पराभव झाला. लोहगाव येथे ११६ एकर जमिनीवर गृहसंकुल उभारले जात आहे. संस्थेची सभासद संख्या ७ हजार २१३ इतकी असून, २०२२-२०२७ या कालावधीसाठी निवडणूक घेण्यात आली. ११ डिसेंबर रोजी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, नागपूर आणि अमरावती शहरात मतदान झाले. १३ डिसेंबरला शिवाजी मराठा हायस्कूल येथे मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक नीलम पिंगळे यांनी कामकाज पाहिले. विजयी उमेदवार : माजी पोलिस अधिकारी प्रदीप देशपांडे, अरविंद पाटील, राजेंद्र मोरे, भारतकुमार राणे, सुरेश भामरे, बरकत मुजावर, नारायण इंगळे, किशोर जगताप, सतीश टाक, अर्जुन गायकवाड, दत्तात्रेय दराडे, पोपटराव आव्हाड, धनंजय कंधारकर, सुभाष भालसिंग, गणेश ठाकरे, प्रल्हाद भोसले, मनीष शेळके, नीलम बोऱ्हाडे, वैशाली जगताप.