बोपदेव घाटातील खुनाचा छडा; चौघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोपदेव घाटातील खुनाचा छडा; चौघांना अटक
बोपदेव घाटातील खुनाचा छडा; चौघांना अटक

बोपदेव घाटातील खुनाचा छडा; चौघांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः मित्रांसमवेत जेवण्यासाठी गेल्यानंतर तेथे झालेल्या वादामुळे मित्रांनीच तरुणावर गोळ्या घालून त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (ता.११) रात्रीच्या सुमारास बोपदेव घाटाच्या परिसरात घडली.

गणेश नाना मुळे (वय २१, रा. सातववाडी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रोहन राजेंद्र गायकवाड (वय २३), अक्षय संदीप गंगावणे (वय २१ ), योगेश सुभाष भिलारे (वय २४, तिघे रा. सातववाडी, हडपसर) व चेतन परमेश्वर कुदळे (वय २४, रा. बनकर कॉलनी हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गणेशचे वडील नाना मुळे (वय ४५, रा. संकेत विहार, फुरसुंगी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश रविवारी मित्रांसोबत बाहेर गेला. मित्रांनी दारू प्यायली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाले. या दरम्यान देशी बनावटीच्या पिस्तुलातून उडालेली गोळी मुळेच्या शरीरात शिरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे मित्रांनी चौकशीत सांगितले. त्याचा मृतदेह बोपदेव घाटात टाकून दिल्याची कबुली मित्रांनी दिली. त्याची दुचाकी शिंदवणे घाटात तर पिस्तूल देहूगावात नदीत फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक चैत्राली गपाट, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, राहुल ढमढेरे, रमेश साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.