अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमलीपदार्थांची विक्री 
करणाऱ्या तिघांना पकडले
अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना पकडले

अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना पकडले

sakal_logo
By

पुणे : अमलीपदार्थ विक्रीसाठी आलेल्यअमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना पकडले तिघांना गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने पकडले. बंडगार्डन रस्ता, मार्केट यार्ड, कोरेगाव पार्क भागात ही कारवाई केली असून त्यांच्याकडून चरस, गांजा, मेफेड्रोन (एमडी) असे नऊ लाख ३४ हजारांचा साठा जप्त केला.
अमलीपदार्थ विरोधी पथकाने मार्केट यार्ड भागात चरस विक्री करण्यासाठी आलेल्या सुरेश सिद्धराम नाटेकर (वय ३३, गंगाधाम, मार्केट यार्ड) याला पकडले. त्याच्याकडून दोन लाख ३१ हजारांचे २३१ ग्रॅम चरस जप्त केला. कोरेगाव पार्क भागात अमलीपदार्थ विक्री प्रकरणात आकाशचंद्र पार्थव नायक (वय ३७, रा. ओदिशा) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार लाख ८३ हजार रुपये किमतीचा २४ किलो गांजा जप्त केला.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात एकजण मेफेड्रोन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमलीपदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जावेद अजीज सय्यद (वय ३३, रा. मिठानगर, कोंढवा) याला पकडले. त्याच्याकडून दोन लाख १० हजारांचे मेफेड्रोन जप्त केले. अमलीपदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. डी. नरके, मयूर सूर्यवंशी, चेतन गायकवाड, साहिल शेख, आझीम शेख आदींनी ही कारवाई केली.