संशोधन व समीक्षा ही परस्परपूरक क्षेत्रे ः डॉ. दिलीप धोंडगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशोधन व समीक्षा ही परस्परपूरक क्षेत्रे ः डॉ. दिलीप धोंडगे
संशोधन व समीक्षा ही परस्परपूरक क्षेत्रे ः डॉ. दिलीप धोंडगे

संशोधन व समीक्षा ही परस्परपूरक क्षेत्रे ः डॉ. दिलीप धोंडगे

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : ‘‘जिज्ञासेपोटी संशोधनाची वृत्ती बनते.‘संशोधन व समीक्षा ही क्षेत्रे प्रक्रियादृष्ट्या भिन्न आहेत, मात्र ती परस्परविरोधी नाहीत. किंबहुना ती परस्परपूरक आहेत. संशोधन व समीक्षा यांचे अभ्यास क्षेत्र एकच आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक- संशोधक डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले.

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संशोधन विभागाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त सर परशुरामभाऊ महाविद्यालय व संस्कृती प्रकाशन यांच्या सहकार्याने ‘संशोधन- स्वरूप आणि व्याप्ती’ या विषयावर एकदिवशीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. धोंडगे बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड अध्यक्षस्थानी होते.
डॉ. मनोहर जाधव म्हणाले, ज्ञानाच्या व संशोधनाच्या क्षेत्रात तडजोडीला वाव नाही. संशोधन ही वृत्ती असते. ती जोपासण्यासाठी व्यासंग, ध्येयवाद, जिद्द व चिकाटी यांची आवश्यकता असते. अटी-शर्तींच्या पलीकडे, विद्यापीठाबाहेर आनंदासाठी निरपेक्षपणे गुणवान संशोधन अजूनही होते आहे.
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे यांनी प्रास्ताविक केले व अध्यक्षा डॉ. उज्ज्वला गोखले यांनी स्वागत केले. डॉ. कीर्ती मुळीक व डॉ. सुजाता शेणई यांनी चर्चासत्राचे आयोजन केले. संस्कृती प्रकाशनाच्या सुनीताराजे पवार यावेळी उपस्थित होत्या. डॉ. रेखा साने, डॉ. शिरीष लांडगे, डॉ. वंदना महाजन, डॉ. सुधाकर शेलार, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. नानासाहेब पवार, डॉ. नीलिमा गुंडी यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला.