नारायणराव सणस विद्यालयात आरोग्य तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणराव सणस विद्यालयात आरोग्य तपासणी
नारायणराव सणस विद्यालयात आरोग्य तपासणी

नारायणराव सणस विद्यालयात आरोग्य तपासणी

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : नारायणराव सणस विद्यालयात सुमारे १६०० विद्यार्थी आणि ५० शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची तपासणी औंध येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. तुळशीदास भालके, अश्विनी शिंदे, वैभव पिसे, आशा शेळके, देवेंद्र खैरे, अमृता सारडा, रेश्मा चोरगे यांनी केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बांदल, उपमुख्याध्यापक पोपट कांबळे, पर्यवेक्षक महादेव पवार, पर्यवेक्षिका सुवर्णा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील चोले यांनी शालेय आरोग्य तपासणीचे नियोजन केले.

‘सकारात्मक पालकत्व’वर मार्गदर्शन
पुणे, ता. १८ : मुक्तांगण इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळेच्या समुपदेशक सावनी ओक-काळे यांनी मुख्याध्यापिका मीना राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सकारात्मक पालकत्व’ विषयावर सत्र आयोजित केले होते. इयत्ता दहावीच्या पालकांसाठी हे सत्र घेण्यात आले. यात ओक-काळे यांनी मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे अधोरेखित केले. ‘‘पालकांनी मुलाला नाही म्हणायला शिकले पाहिजे,’’ असा सल्ला देत त्यांनी किशोरवयीन समस्यांशी संबंधित मुलांशी कसे वागावे, याबाबत टिप्स दिल्या. मीना राणे यांनीही आजच्या सामाजिक परिस्थितीत पालकांना आणि शाळेला कोण-कोणत्या आव्हानांचा सामना करणे आवश्यक आहे याबद्दल पालकांना संबोधित केले.