गावरान कुक्कुटपालन व्यवसायातील संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावरान कुक्कुटपालन व्यवसायातील संधी
गावरान कुक्कुटपालन व्यवसायातील संधी

गावरान कुक्कुटपालन व्यवसायातील संधी

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : कृषीपूरक व्यवसायांमध्ये परसबागेतील गावरान कोंबड्यांचे कुक्कुटपालन हा सोईस्कर आणि तुलनेने सोपा व्यवसाय आहे. या व्यवसायाबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा येत्या शनिवारी (ता. २४) व रविवारी (ता. २५) होणार आहे. यात परसबागेतील कुक्कुटपालन व्यवसायाचे महत्त्व, विकसित पक्ष्यांच्या विविध जाती, उपजाती (वनराज, गिरीराज, ग्रामप्रिया, श्रीनिधि, कृषीब्रो, ग्रामश्री, सुवर्णधारा, कावेरी, कडकनाथ इ.) पक्ष्यांचे व्यवस्थापन, औषध व लसीकरण व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, पक्ष्यांचा निवारा-शेड व्यवस्थापन, व्यवसायाचे अर्थशास्त्र-भांडवली गुंतवणूक, नफा तोट्याचे गणित, व्यवसायाचा प्रकल्प आराखडा, चिकन व अंड्यांचे विक्री व्यवस्थापन, पदार्थांचे मूल्यवर्धन, मार्केटिंग-बाजारपेठ, पोल्ट्री यशस्वी करण्याची सूत्रे, बँकेला प्रकल्प सादरीकरणाची कागदपत्रे, वित्तसहाय्य, व्यवसायासाठी शासकीय अनुदान आदींविषयी मार्गदर्शन तसेच पोल्ट्री फार्मला व्हिजिटचे आयोजन आहे. प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१
कार्यशाळेचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट नं.१, बाणेर रोड, औंध, पुणे