दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू
दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः कोंढवा व उरुळी कांचन या दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी काळभोर व कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढव्यात झालेल्या अपघातामध्ये ओंकार गौतम वाघमारे (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र सुमीत म्हस्के (वय २०, रा. बिबवेवाडी) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी सुमीतने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुमीत व त्याचा मित्र ओंकार असे दोघेजण सुमीतच्या दुचाकीवरून शुक्रवारी (ता.१६) रोजी कोंढव्यातील खडी मशिन चौकातून जात होते. सुमीत दुचाकी चालवीत होता, तर ओंकार हा त्याच्या पाठीमागे बसला होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी दिनेश रासकर करीत आहेत.

उरुळी कांचन येथे झालेल्या अपघातात अविनाश शिवाजी बागडे (वय १९, रा. माकर वस्ती, सहजपूर, हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.शिवाजी बागडे (वय ४८) यांनी याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिवाजी बागडे यांचा मुलगा अविनाश व त्याचे दोन मित्र हिंजवडी येथे बुधवारी (ता. १४) पहाटे मालवाहू वाहनातून माल घेऊन गेले होते. उरुळी कांचन येथील तळवडी चौकात चहा घेऊन झाल्यानंतर त्यांचा मुलगा अविनाश हा त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडत होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने त्यास जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.