किमान तापमानात घट होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किमान तापमानात घट होण्याची शक्यता
किमान तापमानात घट होण्याची शक्यता

किमान तापमानात घट होण्याची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या पावसाळी आणि ढगाळ वातावरण निवळल्यानंतर आता राज्यात आकाश निरभ्र होत आहे. राज्यात येत्या आठवड्यात हवामान कोरडे राहील. तसेच किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा क्षेत्र निवळत आहे. पण बंगालच्या उपसागरात मध्य भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याच कालावधीत उत्तरेकडे मात्र थंडीची लाट येत आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर राजस्थानमध्ये येत्या तीन दिवसांत थंडीचा लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. परिणामी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून राज्यातील किमान तापमानात काहीशी घट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांना नाताळ सण आणि सरत्या वर्षांच्या शेवटच्या दिवसांत आल्हाददायक गारवा अनुभवता येणार आहे.
पूर्व विदर्भात किमान तापमानाचा पारा घसरला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. राज्यात रविवारी नागपूरमध्ये १२.२ अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम-मध्य अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राचा प्रभाव कमी होत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात मध्य भागात आणि हिंद महासागराच्या पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

प्रमुख शहरांमध्ये रविवारीचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
- मध्य महाराष्ट्र : पुणे (१७.२), कोल्हापूर (२०.९), महाबळेश्वर (१६.२), नाशिक (१७.६), सातारा (१८.६)
- कोकण-गोवा : मुंबई (२४.८), रत्नागिरी (२२.८), पणजी (२२.१)
- मराठवाडा : औरंगाबाद (१४.२), परभणी (१८), नांदेड (१९)
- विदर्भ : नागपूर (१२.२), अमरावती (१६.१), ब्रह्मपुरी (१३.९), गोंदिया (१४.८), वर्धा (१४)