‘एमसीई’ सुरु करणार आता कवितांचे वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एमसीई’ सुरु करणार 
आता कवितांचे वर्ग
‘एमसीई’ सुरु करणार आता कवितांचे वर्ग

‘एमसीई’ सुरु करणार आता कवितांचे वर्ग

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः संगीत, क्रिकेट, वाद्य, नृत्य या प्रमाणेच महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे (एम.सी.ई) आता कवितेचे वर्ग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली.
संस्थेच्या ‘स्पोकन मराठी अकादमी’तर्फे सुरू होणाऱ्या या कवितांच्या वर्गांत कोणालाही प्रवेश घेता येईल. मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य ज्यात दडले आहे, अशा ‘कविता’ या साहित्यप्रकाराबाबत आजकाल जाणविणारी उदासीनता दूर करण्यासाठी हे पाऊल आम्ही उचलले आहे, असे इनामदार यांनी सांगितले.
सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार म्हणाल्या, ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’, असे मराठी भाषेचे गौरवगीत लिहिणारे कविश्रेष्ठ सुरेश भट यांचे शिष्य व मराठीतील सुप्रसिद्ध कवी आणि ज्येष्ठ पत्रकार प्रदीप निफाडकर हे या वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत. हा वर्ग दर शनिवारी सायंकाळी चार ते सहा व रविवारी सकाळी आठ ते दहा अशा वेळेत होईल. सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेतली जाईल. त्यातील विजेत्यांना बक्षिसे व प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाईल.’’
इनामदार यांनी मराठी भाषेचे वैभव सांगताना मराठी कवितेत ७० हून अधिक प्रकार असून ते सर्व निफाडकर शिकविणार आहेत. कवितेला आवश्यक छंद-वृत्त याचे शिक्षणही या वर्गात दिले जाणार असल्याचे सांगितले.
---------