पुण्यात कडाक्याच्या थंडीची चाहूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात कडाक्याच्या थंडीची चाहूल
पुण्यात कडाक्याच्या थंडीची चाहूल

पुण्यात कडाक्याच्या थंडीची चाहूल

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः निरभ्र आकाश आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहराला पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीची चाहूल लागली आहे. रविवारी (ता. १८) पहाटे १७.२ अंशावर असलेले सरासरी किमान तापमान सोमवारी १४. २ अंश सेल्सिअसवर येऊन ठेपले आहे. पुढील तीन दिवस तरी शहरात आकाश निरभ्र आणि थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
ढगाळ वातावरण निवळल्याने शहरासह राज्यभरातच किमान तापमानाचा पारा काहीसा खाली आला आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी बोचरी थंडी जाणवत आहे. तसेच, निरभ्र आकाशामुळे दुपारी उन्हाचाही चटका काहीसा जाणवत असून, कमाल तापमानही सरासरी ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविले जात आहे. मंगळवारपासून (ता. २०) संपूर्ण राज्यातच पहाटेच्या किमान तापमानात घट होऊन १० अंश सेल्सिअस पर्यंत, तर दुपारच्या कमाल तापमानातही घट होऊन २९ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावू शकते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्यातील उर्वरित १०-१२ दिवसात थंडीत चांगलीच वाढ होऊन, ही थंडी कदाचित ३१ डिसेंबरपर्यंतही टिकून राहू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पुण्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
शनिवार (ता.१७) ः १७.०
रविवार (ता.१८) ः १७.२
सोमवार (ता.१९) ः १४.२
----------------