
ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी
पुणे, ता. १९ : जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. २०) होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी निर्देश दिले असून, सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबर रोजी पार पडली होती.
जिल्ह्यातील तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण : वेल्हा ः जुनी पंचायत समिती सभागृह, भोर ः औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दौंड ः तहसील कार्यालय सभागृह, बारामती ः नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, इंदापूर ः शासकीय धान्य गोदाम कालठण रोड, जुन्नर ः तलाठी सभागृह तहसील कार्यालय, आंबेगाव ः तहसील कार्यालय, खेड ः हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तालुका क्रीडा संकुल तिन्हेवाडी, शिरूर ः नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, मावळ ः संजय गांधी शाखा इमारत तहसील कार्यालय, मुळशी ः सेनापती बापट सभागृह पंचायत समिती, हवेली ः तहसीलदार कार्यालय, शुक्रवार पेठ.