
रिंगरोड
शंभर टक्के प्रयत्न म्हणजेच ‘यश’!
‘सकाळ’ने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमात श्रीमद्भगवद्गीतेतील विचारांचा जगभर प्रसार करणारे इस्कॉनचे गौरांग दास यांनी एक विचार मांडला. ‘यश’ याचा अर्थ ‘विजय’ असा नाही, तर तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे शंभर टक्के प्रयत्न करा, असा आहे. आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर कितीही संकटे आली तरीही ‘आशा’ सोडू नका. पण ज्या वेळी आशेचा किरण नसेल तर तेथे यश मिळविणे अवघड असते. पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंगरोडची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी हा विचार लक्षात ठेवावा. आता मंत्री शंभूराज देसाई यांनी डिसेंबर २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असे विधानसभेत जाहीर केले आहे. त्यामुळे आता तरी नेटाने काम होऊ द्या. याबाबत आपल्या सूचना नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.