पं. प्रमोद मराठे यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पं. प्रमोद मराठे यांचा सत्कार
पं. प्रमोद मराठे यांचा सत्कार

पं. प्रमोद मराठे यांचा सत्कार

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : ज्येष्ठ हार्मोनिअम वादक व गुरू पं. प्रमोद मराठे यांच्या षठ्यब्दीपूर्तीनिमित्त त्यांच्या शिष्य परिवारातर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. २२) सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडेल. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मा तळवलकर यांच्या हस्ते पं. मराठे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी डॉ. अरविंद थत्ते पं. मराठे यांची प्रकट मुलाखत घेणार आहे. त्यानंतर पं. सुधीर नायक यांचे स्वतंत्र हार्मोनिअम वादन होणार असून, त्यांना सत्यजित तळवलकर हे तबल्यावर साथसंगत करणार आहेत.