हेगडे, जाधव यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेगडे, जाधव यांना पुरस्कार
हेगडे, जाधव यांना पुरस्कार

हेगडे, जाधव यांना पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : एस. बी. जोशी स्थापत्य शास्त्रातील रचना व उत्कृष्ट पूल बांधणीचा २८ वा पुरस्कार ‘एसटीयुपी’चे माजी कार्यकारी संचालक व्ही. एन‌. हेगडे यांना देण्यात आला. तसेच डॉ. सी. व्ही. कांड यंग ब्रिज इंजिनिअर पुरस्कार स्ट्रक्टकॉन डिझाइन्सच्या सिनिअर डिझाइन मॅनेजर मनीषा जाधव यांना प्रदान केला.
सीओईपी टेक माजी विद्यार्थी संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. सुजित परदेशी, संयोजक प्रा. बी. एम. डवरी, व्ही. एन. शिंदे, अविनाश जोशी, सुहासिनी माढेकर, सुनील कांड व आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘‘एस. बी. जोशी हा पुरस्कार, भारतातील पूल अभियांत्रिकी क्षेत्रातील नव्या कल्पनांची पूर्तता करण्यासाठी, या क्षेत्रातील तरुण अभियंत्यांना प्रेरणा देणारा पुरस्कार आहे.’’ कांड म्हणाले, ‘‘डॉ. सी. व्ही. कांड हे पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. वेगाने वाहणाऱ्या नद्या व पुलांचे बांधकाम यावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. त्यांचे काम नविन पिढीसाठी आदर्श व उत्तम मार्गदर्शक ठरणारे आहे.’’
दोन्ही पुरस्कार विजेत्यांनी आपापले अनुभव सांगितले. या कार्यक्रमात एस. बी. जोशी व डॉ. सी. व्ही. कांड यांच्यावरील स्मरणिकेचे प्रकाशन झाले. ज्योती भुसारी यांनी आभार मानले.