सलग दोन दिवस तापमान ११.५ अंशांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलग दोन दिवस तापमान ११.५ अंशांवर
सलग दोन दिवस तापमान ११.५ अंशांवर

सलग दोन दिवस तापमान ११.५ अंशांवर

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः सलग दोन दिवस पुणे शहरातील किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. पुढील तीन दिवस तरी शहरातील थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीचा परिणाम पुण्यासह राज्याच्या तापमानावरही झाला आहे. राजस्थानच्या वायव्ये दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मंगळवार (ता.२७) पर्यंत शहरासह राज्यात थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सोमवार (ता.१९) नंतर शहरातील किमान तापमानात सरासरीपेक्षा मोठी घट झाली असून, निरभ्र आकाश आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी, तर दुपारी उन्हाचा कडाकाही काही अंशी जाणवेल.

शहरातील सरासरी किमान तापमान (अंश सेल्सिअस)
सोमवार ः १४.२
मंगळवार ः ११.४
बुधवार ः ११.५